Goat, Sheep e-sakal
पुणे

पुणे : स्वयंरोजगारासाठी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

विविध योजनांसाठी ४ ते १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील सुशिक्षित, बेरोजगार युवकांसह पशुपालक आणि शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांसाठी ४ ते १८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे वाटप करणे, शेळी-मेंढी वाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी शेड उभारणीस अर्थसाहाय्य, शंभर कुक्कुट पिलांचे वाटप आदी योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२१-२२ या वर्षात राबविण्यात येणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. तसेच, गुगल प्ले-स्टोअरवर एएच-महाबीएमएस हे ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲप उपलब्ध आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील. अधिक माहितीसाठी तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

Commonwealth Games 2026: १० पैकी १०! भारताच्या बॉक्सर्सनी इतिहास-भूगोल बदलला; १० 'सुवर्ण' पदकांवर दावा ठोकला... आज फैसला

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

SCROLL FOR NEXT