In Pune University 24 people were corona positive in In the security department only 
पुणे

महापालिकेला सल्ला देणाऱ्या पुणे विद्यापीठाला कोरोनाने घेरले; सुरक्षा विभागात सर्वाधिक बाधित

ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुण्यातील 'कोरोना' नियंत्रणात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तज्ज्ञ प्रशासनाला सल्ले देऊन उपाययोजना राबवत आहेत. मात्र, दुसरीकडे पुणे विद्यापीठातच 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढत चालल्याने तेथील रहिवाशांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. एकट्या सुरक्षा विभागातच २४ जणांना लागण झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात एप्रिल महिन्यापासून 'कोरोना'ने हाहाकार माजवलेला आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही सरासरी ३०-३५ अशी आहे. शहरात 'कोरोना' वाढत असताना अडीच तीन हजार लोकांची वस्ती असलेल्या पुणे विद्यापीठाने केलेल्या उपाययोजनेमुळे सुरूवातीच्या लाॅकडाऊनच्या काळात येथे 'कोरोना'चा शिरकाव झाला नाही. संपूर्ण परिसर सुरक्षित होता. मात्र, अनलॉकच्या दिशेने जात असताना विद्यापीठात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, वेळीच माहिती दिली जात नसल्याने प्राध्यापक, कर्मचारी यांच्यात भिती आहे. 

सुरक्षा विभागात लागण
पुणे विद्यापीठात सर्व इमारती, प्रवेशद्वार याठिकाणी पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे रक्षक तैनात असतात. गेल्या आठवड्यात एका सुरक्षा रक्षकाला 'कोरोना' झाल्याचे लक्षात येताच उर्वरीत सुरक्षा रक्षकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०० जणांमध्ये २३ जणांना 'कोरोना' झाल्याचे समोर आले. हे सर्वजण सध्या गरवारे आणि सीओईपी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. तर, शुक्रवारी आणखी एकास लागण झाली आहे.

यापूर्वी परीक्षा व इस्टेट विभागात रुग्ण
विद्यापीठात दोन तीन आठवड्यापूर्वी परीक्षा विभागातील एक अधिकारी, इस्टेट विभागातील कर्मचारी यांना लागण झाली होती. तसेच एका ज्येष्ठ प्राध्यापकांचा कोरोनातून बरे झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. त्यामुळे विद्यापीठात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची रिपरिप सुरूच; पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता

"कार्यालय सुरू झाल्याने 'कोरोना' कोणालाही होऊ शकतो. सुरक्षा विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी रुग्ण आढळले. एखाद्याला लागण झाल्यानंतर त्वरीत त्याबाबत प्रशासनाने माहिती देऊन इतरांना सतर्क केले पाहिजे. सध्या पुणे विद्यापीठात रहाणाऱ्या  प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यात भितीचे वातावरण आहे."
- एक प्राध्यापक

"सुरवातीला विद्यापीठात कोरोना नव्हता, पण आता संख्या वाढत आहे. विद्यापीठाने उपाययोजना करावी व रुग्ण आढळल्यास त्यांची माहिती उडत उडत येण्यापेक्षा अधिकृतपणे सांगितल्यास खबरदारी घेता येईल."
- कर्मचारी, पुणे विद्यापीठ वसाहत

आणि दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दाखल झाली क्विक ऍक्शन टीम

"कोरोना'बाबत पुणे विद्यापीठ सतर्क आहे. एक सुरक्षा रक्षक पाॅझिटीव्ह आल्यानंतर २०० जणांची तपासणी केली. त्यातील २३ जण पाॅझिटीव्ह आले आहेत. आम्ही वेळेवर खबरदारी घेत आहोत. तसेच विद्यापीठ आवारात व कार्यालयात मास्क न वापरणाऱ्यांवर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे."
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT