Pune University sakal
पुणे

पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार नोंदणीकृत १० उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. अधिसभेवर पुढील पाच वर्षासाठी या प्रतीनिंधीची निवड केली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया निर्भिडपणे परंतु जबाबदारीपूर्वक पार पाडा, असे आवाहन कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी बूथ प्रतिनिधी, केंद्र निरीक्षक आणि विभागीय निरीक्षकांना केले आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार सांगतात, ‘‘एकूणच निवडणुकीची प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.

पदवीधरांच्या नावनोंदणीसाठी विद्यापीठाने बातम्या, पोस्टर, वृत्तपत्रातील जाहिरात आणि रेडिओ एफएमवरही जाहिरात केली. निवडणुकीसाठी कुलगुरू व प्र- कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत असणार आहे. महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत विद्यापीठाचे अधिकारी मोठ्या संख्येने असणार आहेत. मतदान केंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.’’ या मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यापीठातील ७४ प्राध्यापक व अधिकारी 'केंद्र निरीक्षक' म्हणून तर ११४ विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी 'बूथ प्रतिनिधी' म्हणून कार्यरत असणार आहेत.

१० जागांसाठी ३७ उमेदवार -

पदवीधर मतदार संघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी ४ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

अधिसभा पदविधर निवडणूक थोडक्यात..

- जागा - १०

- उमेदवार - ३७

- मतदार - १ लाख २० हजार

- एका बूथमागे मतदार संख्या - १०००

- एकूण बूथ - ११४

- एकूण मतदान केंद्रे - ७१

मतदान केंद्रे - पुणे शहर - २६, पुणे ग्रामीण - १०, अहमदनगर - १५ , नाशिक - १९, सिल्वासा - एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT