Pune University Sakal
पुणे

व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठ आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय संस्थेत सामंजस्य करार

व्यवस्थापन क्षेत्रातील नवोपक्रम, स्टार्टअप अशा अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यातून व्यवस्थापन क्षेत्रातील नवोपक्रम, स्टार्टअप अशा अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन सेल’च्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव, कुलसचिव व्ही. सुधीर, ए. के. तिवारी आदी उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात नवे उद्योजक निर्माण करण्याच्या हेतूने उद्योग नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांना माफक शुल्कात अनेक नवीन अभ्यासक्रम उपलब्ध होऊ शकणार आहेत. सहकार विषयात नवीन स्टार्टअप तयार होण्यास मदत होईल, असे डॉ. पालकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान

Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली अन् इथे स्टार ऑल राऊंडरला दुखापत झाली; महत्त्वाच्या सामन्याला मुकणार...

Nilesh Ghaiwal: घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश? पुणे पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT