पुणे

पुणे विद्यापीठात जैव अर्थशास्त्राचे केंद्र सुरू

CD

पुणे विद्यापीठात
जैव अर्थशास्त्राचे केंद्र सुरू

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी’ केंद्र सुरू झाले आहे.
जैव अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रासाठी संशोधन, शिक्षण तसेच उद्योग सहकार्याला चालना देणारे उपक्रम या केंद्रातून राबविले जातील. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केंद्रासाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ. चौधरी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, तंत्रज्ञान विभागातील डॉ. सोमनाथ नंदी, डॉ. वंदना धिंग्रा, प्राज इंडस्ट्रीजचे घनश्याम देशपांडे, अतुल मुळे, डॉ. प्रमोद कुंभार, दत्तात्रय निंबोळकर, आनंद घोसाळकर उपस्थित होते.
सादरीकरण करताना डॉ. नंदी यांनी सांगितले, की या केंद्राच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षापासूनच ‘एमटेक’च्या विद्यार्थ्यांसाठी ‘शाश्वत विकासासाठी जैव-अर्थव्यवस्था’ आणि ‘जैवइंधन व जैवऊर्जा’ असे दोन नवे अभ्यासक्रम उपलब्ध होतील. केंद्र संचालकपदासाठी डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाचा प्रस्ताव आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी’ केंद्रातील प्रयोगशाळेची माहिती घेताना डावीकडून कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी व डॉ. सोमनाथ नंदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT