Pune university chowk traffic Esakal
पुणे

Pune University Road Traffic: प्रवाशी नाश्ता करून आले तरी गाडी जागची हालेना; विद्यापीठ चौकातील ट्राफिकमुळे पुणेकरांची कोंडी

Pune Traffic Due to METRO Work In Pune: गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा पुणेकरांना होणारा त्रास आता असह्य होत आहे.

आशुतोष मसगौंडे

Pune Traffic Updates in Marathi: गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाच्या मेट्रोच्या कामाचा पुणेकरांना होणारा त्रास आता असह्य होत आहे. या कामामुळे रस्त्याची बिघडलेली अवस्था आणि वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. आता आजही सकाळी सहापासून पुणेकर विद्यापीठी चौकात वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत.

बरोबर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर मेट्रोच्या कामासाठी बांधलेल्या कमानीवरील जाळीत लोखंडाचे साहित्य पडल्याने ही जाळी रस्त्यावर आली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते जवळपास शिवजीनगर पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

दरम्यान या प्रकरणी अधिकची माहिती अशी की, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे सध्या काम सुरू आहे. यामध्ये पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर या कामासाठी एक कमान उभारण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी त्या कमानीला नेट लावली होती. दरम्यान आज पहाटे या नेटमध्ये काहीतही लोखंडी नेट पडल्याने ती नेट रस्त्यावर आली. अशात पहाटे सहापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

प्रवाशी नाश्ता करून आले तरी गाडी जागची हालेना

दरम्यान आज निर्माण झालेली ही वाहतूक कोंडीमुळे इतकी भयंकर होती की, पीएमपीएलच्या बसमधील अनेक प्रवाशी नाश्ता करुन आले तरी बस जागची हालली नव्हती.

यावेळी या कोंडीमुळे बसमधील प्रवाशांसह रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनचालकही संतापले होते.

दरम्यान शिवाजीनगरहून औंध-बाणेरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, बाणेरहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर अजूनही कोंडी पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT