Pune university chowk traffic Updates Esakal
पुणे

Pune Traffic Updates: शिवाजीनगर, औध, बाणेर मार्गावरील प्रवाशांचे हाल कायम; विद्यापीठ चौकात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

Pune University Chowk Traffic Updates: काल विद्यापीठ चौकात मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवरील सेफ्टी नेट कोसळल्याने शिवाजीनकगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावरील कामाने जोर धरला आहे. असे असले तरी या कामामुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

काल विद्यापीठ चौकात मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवरील सेफ्टी नेट कोसळल्याने शिवाजीनकगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता आज शिवाजीनगरकडे जाणारी लेन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून वळवल्याने शिवाजीनगरकडून येणाऱ्या लेनमध्ये वळवल्याने चौकात मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी औधकडून येणाऱ्या गाड्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरून शिवाजीनगरकडून येणाऱ्या लेनमध्ये वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकाच लेनमधून दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे. याचबरोबर यामध्ये अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढत आहे.

दरम्यान सकाळी सकाळी ही परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालक, प्रवासी मोठा संताप व्यक्त करत होते.

दरम्यान या मार्गावर हिंजेवाडी आयटी पार्क आहे. याचबरोबर बालेडेवाडीतही काही आयटी कंपन्या आहेत. अशात या मार्गावर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने प्रवास करत असतो. मात्र, विद्यापीठ चौकात सतत होते असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हे नोकरदारही वैतागले असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT