pune university
pune university sakal
पुणे

पुणे विद्यापीठ डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास सुरवात

मीनाक्षी गुरव

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Pune University) संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि  इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट (आयडीएसटी) (IDST) यांच्या एकत्रित प्रयत्नातून विद्यापीठात ‘पीजी डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम (Syllabus) सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी २८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या एक वर्षीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात संरक्षण क्षेत्रातील सर्व मोठ्या तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांची रचना, विकास आणि उत्पादन यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तसेच शस्त्रास्त्र, दारूगोळा, क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल जहाज, जमिनी व समुद्रातील खाणी, पूल रचना, संवाद प्रणाली, अवकाशशास्त्र प्रणाली असे विषय अभ्यासता येणार आहे.

अभ्यासक्रमात अतिथी प्राध्यापक म्हणून संबंधित विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्यक्ष प्रयोगशाळांना भेटी देणे, हा देखील अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग असणार आहे. हा अभ्यासक्रम ३२ श्रेयांकाचा आहे. याबाबतची अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘भारत संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर होत असून या क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. विद्यापीठातील संरक्षण तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामुळे या क्षेत्रातील पायाभूत गोष्टींची माहिती होऊ शकणार आहे. तसेच आगामी काळात यामध्ये संशोधन व नवनिर्मिती करणे शक्य होणार आहे. काही खासगी विद्यापीठांमध्ये संरक्षण या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आहे. परंतु संरक्षण तंत्रज्ञानातील अद्ययावत अभ्यास असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव आहे.’

- डॉ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

- अभ्यासक्रम : पीजी डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी

- जागा : ४० आणि लष्करातील अधिकारी

- पात्रता : विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवीधर

- निवड : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

- माहितीसाठी संकेतस्थळ : www.unipune.ac.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

अग्रलेख : प्रचारासाठी दाहीदिशा...

Loksabha Election 2024 : ‘विरोधक’ आता एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Live Update : राज्यभर आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT