पुणे, ता. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृहांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत संबंधित केटरर्सच्या परवान्याचे निलंबन केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने त्या केटरर्सची सेवा बंद केली आहे. भोजनगृहाची सेवा सुरू करण्यासाठी लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
विद्यापीठातील भोजनगृहात झुरळांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ वातावरणात अन्न निर्मिती, स्वच्छतेचा अभाव अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. मात्र, या तक्रारींवर विद्यापीठाने ठोस कार्यवाही न केल्याने विद्यार्थ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृहाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्याने मे. मराठा केटरर्सच्या परवान्याचे निलंबन केले. त्यानंतर, हे भोजनगृह बंद झाले. दरम्यान, विद्यापीठाने संबंधित विद्यार्थिनींच्या नाश्ता आणि जेवणाची सोय रिफेक्टरीमध्ये केली आहे. लवकरच भोजनगृह सुरू करण्यासंदर्भातील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते सुरू करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.
‘‘मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृहातील सेवा देण्यासाठी नव्याने येणाऱ्या केटरर्सकडून तरी विद्यार्थिनींना स्वच्छ, सुरक्षित आणि सकस आहार मिळेल, अशी अपेक्षा आहे. कारवाईपुरते न थांबता भोजनाच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा व्हावी आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेतली जावी.’’
- एक विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.