Pune University
Pune University Sakal
पुणे

पुणे विद्यापीठाने शुल्कवाढीला स्थगिती न दिल्यास विद्यार्थ्यांना फटका

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) कोरोनामुळे (Corona) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शुल्कवाढीच्या निर्णयाची (Fee Decision) अंमलबजावणी एका वर्षासाठी पुढे ढकलली होती. आता विद्यापीठाकडून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन (Planning) सुरू असून, शुल्क वाढीस आणखी एक वर्ष स्थगिती देण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने पालकांपुढे (Parents) आर्थिक संकट उभे आहे. विद्यापीठाने शुल्कवाढीस स्थगिती दिली नाही तर लाखो विद्यार्थ्यांना (Student) याचा फटका बसणार आहे. (Pune University does not take a Decision to Increase Fees Millions of Students will be Hit)

पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांत पुणे विद्यापीठाशी संलग्न ९५० संस्था असल्या तरी त्यातील ७०० संस्थांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रम शिकवला जातो. या महाविद्यालयांत साडेपाच लाख विद्यार्थी शिकत आहेत. उर्वरित संस्था या व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवतात. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या शुल्क वाढीस विद्यापीठाची मान्यता असते. शुल्क वाढीसंदर्भात समितीच्या अहवालानंतर जुलै २०२० पासून शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. पण, कोरोनामुळे या निर्णयास विद्यापीठाने एका वर्षासाठी स्थगिती दिली होती.

विद्यापीठाने सुचविलेली ही शुल्कवाढ अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार १५ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना २०२१-२२ या नव्या शैक्षणिक वर्षात मोठा भूर्दंड बसण्याची शक्यता आहे. या शुल्कवाढीस ब्रेक लावण्यासाठी व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेत निर्णय होणे आवश्‍यक आहे. मात्र, कोणतीही प्रक्रिया सुरू नाही. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

जूनमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरू

२०२०-२१ या वर्षाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा या महिन्यात सुरू होतील. त्यानंतर सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्षाचे वर्ग सुरू होतील. पण, विद्यापीठाने मे महिन्यात परिपत्रक काढून १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शुल्क यानुसारच निश्‍चीत केले जाईल.

कोरोनाची स्थिती पुढील वर्षीही कायम राहण्याची शक्यता आहे. पालक व विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शुल्कवाढ करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ही स्थगिती वाढवली पाहिजे, याबाबत चर्चा केली जाईल.

- डॉ. संजय चाकणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

विद्यापीठाने १२ वर्षे शुल्कवाढ केलेली नव्हती, त्यामुळे गेल्यावर्षी शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे शुल्कवाढीस एका वर्षासाठी स्थगिती दिली आहे. पुढील वर्षाबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.

- डॉ. सुधाकर जाधवर, सदस्य, व्यवस्थापन परिषद

माझ्या वडिलांचे हॉटेल वर्षभर बंद आहे, पैशांची अडचण आहे. असे असताना विद्यापीठाने शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेऊ नये. उलट आम्ही वर्षभर महाविद्यालयात गेलेलो नसल्याने ग्रंथालय, कॉम्प्युटर यांसह इतर न वापरलेल्या सुविधांचे शुल्क परत करण्याचा निर्णय घ्यावा.

- जुबेर चकोली, विद्यार्थी, विधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT