Pune University Sakal
पुणे

संपूर्ण शुल्क भरले नाही तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रक द्या; विद्यापीठाचे आदेश

संपूर्ण शुल्क भरले नाही म्हणून महाविद्यालयांना आता विद्यार्थ्यांचे गुणपत्रक रोखता येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संपूर्ण शुल्क भरले नाही म्हणून महाविद्यालयांना आता विद्यार्थ्यांचे गुणपत्रक रोखता येणार नाही. गुणपत्रक नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने महाविद्यालयांनी तातडीने विद्यार्थ्यांना गुणपत्रक वितरित करावे, असा आदेशच काढला आहे. (Pune College Student)

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. मात्र काही महाविद्यालयांनी अजूनही विद्यार्थ्यांना गुणपत्रक प्रदान केलेले नाही. याबद्दल परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे परिपत्रकात म्हणतात, ‘‘अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरल्या शिवाय गुणपत्रक देत नाही. अशी तक्रार शिक्षण सहसंचालकांना प्राप्त झाली आहे. तरी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रक त्वरित वितरित करण्यात यावे.’’ विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळत नसल्याची तक्रार युवक क्रांती दलाने उच्च शिक्षण संचालकांना केली होती. त्याचीच दखल घेत उच्च शिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठांना कळविल्याचे, युक्रांदचे शहर कार्यवाह कमलाकर शेटे यांनी सांगितले.

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे अर्जाची मुदत वाढवत २८ फेब्रुवारी करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ओबीसी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक अशा विविध प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक शुल्कात सवलत, तसेच वसतिगृहाच्या शुल्कासाठी भत्ता, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या १४ शिष्यवृत्ती दिल्या जातात. राज्यातील लाखो विद्यार्थी महाडीबीटीवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत गुणपत्रक मिळाले तर त्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : जोतिबा डोंगरावर आज श्रावणषष्ठी यात्रा; महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येणार

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT