Savitribai Phule Pune University sakal
पुणे

Pune University : गुणपत्रिकेसाठी पैसे घेणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्याचे निलंबन

विद्यार्थ्याला गुणपत्रक देताना पैसे घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ सहायक (सर्वसाधारण) डॉ. संजय नेवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विद्यार्थ्याला गुणपत्रक देताना पैसे घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ सहायक (सर्वसाधारण) डॉ. संजय नेवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार डॉ. नेवसे यांचे निलंबन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत हे त्यांना निलंबित केले आहे.

कला पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ए) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका मिळविण्यासाठी विद्यार्थ्याकडून पैसे मागितल्याची तक्रार २६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे आली आहे. संबंधित विद्यार्थ्याची गुणपत्रिका देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि विद्यार्थ्याकडून तीन हजार रुपये घेऊन, त्याला गुणपत्रिका दिल्याची तक्रार आहे.

याबाबत डॉ. नेवसे यांनीही पैसे घेतल्याची कबुली देऊन सर्वासमोर पैसे परत केले प्रथम भंडारी या बी.ए.च्या  शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका मिळविण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याची तक्रार अर्ज २६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे आला आहे.

संबंधित विद्यार्थ्याला गुणपत्रिका दिली आणि त्याच्याकडून पैसे घेतल्याची कबुली देत या घटनेला वैयक्तिक जबाबदार असल्याचे डॉ. नेवसे यांनी कळविले आहे. या प्रकरणाची गांभीर्य पाहून विद्यापीठ प्रशासनाने डॉ. नेवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

Gangapur News: अंगणवाडी सेविका अंजली तूपलोंढे यांच्या निधनाने हळहळ; आमदार प्रशांत बंब यांनी कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन

SCROLL FOR NEXT