Pune University sakal
पुणे

Pune University : विद्यापीठाचा ९९ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प ; अर्थसंकल्पी अधिसभेत सादर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ९९ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या म्हणजे आर्थिक वर्ष २०२२-२३च्या तुलनेत ही तूट जवळपास ३० कोटींनी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ९९ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या म्हणजे आर्थिक वर्ष २०२२-२३च्या तुलनेत ही तूट जवळपास ३० कोटींनी वाढली आहे. दरवर्षी वाढत जाणारी अर्थसंकल्पी तूट कशी भरून काढणार?... याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे.

विद्यापीठाची शनिवारी (ता. २३) अर्थसंकल्पीय अधिसभा झाली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके आदी उपस्थित होते. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. ५२८ कोटी जमेचा आणि ६२७ कोटी खर्चाच्या अर्थसंकल्पात विद्यापीठ आवारातील बांधकाम, सेवा-सुविधा, नाशिक व अहमदनगर उपकेंद्राचे बांधकाम यांच्यावर विशेष खर्च केला आहे. तसेच गुणवत्ता सुधार कार्यक्रम आणि शिष्यवृत्तीवर भर दिला आहे.

मांडणीतील त्रुटी...

अर्थसंकल्पीय भाषणातील लेखी आकडेवारीच्या त्रुटींकडे सदस्य विनायक आंबेकर यांनी लक्ष वेधले. अधिकाऱ्यांनी छपाईतील दोष असल्याचे सांगत वेळ मारून नेली. पण विद्यापीठाच्या अर्थसंकल्प मांडणीत कोट्यवधींच्या छपाईत त्रुटी कशी राहू शकते? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पाबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या गांभीर्यावर त्यांनी ताशेरे ओढले.

तूट रोखण्याचे आव्हान...

अर्थसंकल्पीय तूट दरवर्षी वाढत चालली आहे. तिला रोखण्यासाठी विद्यापीठाने विभागांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज अपूर्व हिरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘संसाधने, कर्मचारी आणि

शैक्षणिक शुल्कासंबंधीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर विद्यापीठाने आवश्यक उपाययोजना करायला पाहिजे.’’ उत्पन्नवाढीसाठी

संभाव्य सर्व प्रयत्न करण्याची गरज आहे.’’

महत्त्वाच्या तरतुदी...

कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना : ७ कोटी

संशोधन योजना : ५ कोटी

गुणवत्ता सुधार कार्यक्रम : १३ कोटी

वसतिगृह बांधणे, क्षमता विकास आणि देखभाल : १६ कोटी ३८ लाख

विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले मानांकन कायम राखले असून रिक्त पदांच्या भरतीमुळे आलेख उंचावत जाईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सर्वांना समान संधी आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हा ज्ञानकुंड सतत प्रवाहित राहील.

- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT