savitiribai phule pune university sakal
पुणे

Pune University Admission : पुणे विद्यापीठातील प्रवेशासाठी आजच करा अर्ज; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक सामाईक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक सामाईक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात झाली असून, १० मे पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

विद्यापीठाच्या विभागांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. यासाठी दरवर्षी १०० गुणांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुण्यातील विद्यापीठाच्या मुख्य संकुलासह नाशिक येथील उपकेंद्रातील अभ्यासक्रमांचाही या प्रवेश परीक्षेत सहभाग आहे.

पारंपारिक अभ्यासक्रमांसह व्होकेशनल, तांत्रिक, व्यवस्थापन, ललित कला, उपयोजित विज्ञानातील अनेक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाणारे विद्यापीठ आता पदवी अभ्यासक्रमांबरोबरच सर्वसमावेशक पदवीचे केंद्र बनत आहे. त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविता येणार आहे.

प्रवेश परीक्षेचे स्वरूप -

- २० गुणांचा सामान्य ज्ञान व अभियोग्यतेचा पेपर, तर ८० गुणांचा मुख्य विषयाचा पेपर असेल

- चुकीच्या प्रश्नाला एक चतुर्थांश गुण वजा होणार

- दोन तासाची ऑनलाइन प्रवेश परीक्षा

महत्त्वाच्या तारखा -

- अर्ज करण्याची अंतिम मुदत - १० मे

- पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा - १३ जून

- पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा - १४ ते १६ जून

अधिक माहितीसाठी - https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT