SPPU
SPPU 
पुणे

पुणे विद्यापीठातील पीएचडीसाठी रिक्त जागांची माहिती सादर करण्याचे आदेश

ब्रिजमोहन पाटील

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविता आलेली नव्हती. अखेर २०२१ मध्ये पेट परीक्षा होण्याची शक्यता असून, मान्यताप्राप्त मार्गदर्शकांनी रिक्‍त जागांची माहिती ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडे सादर करावी अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या पीएचडीला विशेष महत्त्व आहे. देशभरातील विद्यार्थी पेट देऊन प्रवेश मिळविण्यासाठी धडपडत असतात. विद्यापीठाने २०१९ मध्ये पेट घेतली होती. त्यानंतर पहिल्या फेरीतील प्रवेश झाल्यानंतर जवळपास एक वर्ष दुसऱ्या फेरीतील प्रवेश झाले नाहीत. ही प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया संपत आल्यानंतर आता पुढील परीक्षेची तयारी सुरू केली आहे. 

हेही वाचा - पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी अद्यापही २५ टक्के विद्यार्थी वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत
पीएचडी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नित मान्यताप्राप्त संशोधन केंद्र येथील मार्गदर्शकांनी आपल्याकडे संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांची माहितीही १५ एप्रिलपर्यंत संशोधन केंद्रामार्फत मार्गदर्शकांनी स्वत:च्या लॉगीनवरून ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून सादर करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहेत. त्यामुळे ज्या मार्गदर्शकांना २०२१ मध्ये विद्यार्थी घ्यावयाचे नसतील, त्यांनीही नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. मार्गदर्शकांनी वेळेत माहिती सादर न केल्यास पीएचडी प्रवेशप्रक्रियेसाठी रिक्‍त जागा विचारात घेतले जाणार नाहीत, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

  • पीएचडीसाठी एकुण जागा - सुमारे ३३००
  • पहिल्या फेरीत निवड झालेले - सुमारे १८००
  • दुसऱ्या फेरतील प्रतिक्षेत - सुमारे १५००
  • पीएचडीसाठी विषय - सुमारे १००
  • पीएचडीचा कालावधी - तीन ते सहा वर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT