Pune University Sakal
पुणे

पुणे विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार ऑनलाइन; अभ्यास मंडळाचा निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा देणे शक्य होणार नाही.

मीनाक्षी गुरव

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने घेतला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाला अंतिम मान्यता घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे महाविद्यालयांकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाला देखील काही मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्याव्यात, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गुरुवारी विज्ञान शाखेच्या सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक झाली. त्यात पहिल्या आणि दुसऱ्या सत्राच्या प्रत्येकी दहा असे एकूण वीस प्रात्यक्षिकाचे व्हिडीओ तयार करण्याचे निश्चित झाले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पुढील दोन ते अडीच  महिन्यांत ऑनलाइन पद्धतीनेच प्रात्यक्षिक घेऊन आणि त्यांचे मूल्यांकन करून गुण देण्याचे ठरविण्यात आल्याचे डॉ. चासकर यांनी सांगितले.

येत्या दोन ते अडीच महिन्यात प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्या लागणार

‘सर्व विषयाच्या अभ्यास मंडळांकडून पुढील आठ दिवसांमध्ये प्रॅक्टिकलचे व्हिडिओ तयार केल्या जाणार आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत हे व्हिडिओ महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जातील. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे, त्यामुळे पुढील एक ते दीड महिन्यांमध्ये महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता नाही. तसेच हे शैक्षणिक वर्ष ऑगस्ट २०२१पर्यंत संपवावे लागणार आहे. त्यामुळे साधारणत: दोन ते अडीच महिन्यात प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. त्याप्रमाणे पावले उचलली जात आहेत.’’

- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT