Pune University Sakal
पुणे

पुणे : विद्यापीठातील आठ प्राध्यापकांना स्टॅनफोर्डचे मानांकन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांना अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे मानांकन मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांना अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे मानांकन मिळाले आहे. स्टॅनफोर्डच्या वतीने जगभरातील संशोधनात आघाडीवर असलेल्या पहिल्या दोन टक्के लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात या प्राध्यापकांचा समावेश आहे. विद्यापीठाबरोबरच पुण्यातील इतरही संशोधन संस्थांतील प्राध्यापकांचा या यादीत समावेश आहे.

२०२१ या वर्षासाठी घोषित झालेल्या यादीत बहुतेक प्राध्यापकांना मागीलवर्षीही मानांकन मिळाले होते. यामध्ये आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय प्राध्यापक आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन, भौतिकशास्त्राचे प्रा. अविनाश खरे, दिवंगत प्रा. एस.के. दाते, प्रा. विकास मठे, प्रा. हबीब पठाण, प्रा. आर.सी. कांबळे, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. राजेश गच्चे, गणित विभागाच्या प्रा. वर्षा गेज्जी, जैवमाहितीशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. स्मिता झिंजडे, प्रा. सुभाष पाध्ये, आंतरविद्याशाखीय विभागातील प्रा. श्रीधर गद्रे, प्रा. बालाप्रसाद अंकमवलावार, प्रा.विश्वास काळे,प्रा.सुमित दास, प्रा.सुभाष पाध्ये यांचा समावेश आहे.

या गोष्टींवर ठरले मानांकन :

- शोधनिबंधांची संख्या आणि दर्जा

- कोणत्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले

- शोधनिबंधांचा इतर संशोधनासाठी संदर्भ म्हणून कितीवेळा वापर झाला

- १९६० पासून २०२१ पर्यंतच्या संशोधनाचा विचार

- २२ विज्ञान विषय आणि १७६ उपविषयांमध्ये केलेल्या संशोधनाचा विचार

भारतीयांचा टक्का कमीच :

स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या यादीत भारतीय शास्त्रज्ञांचा टक्का इतर देशांच्या तुलनेने कमीच दिसत आहे. सर्वाधिक संशोधक हे अमेरिकेतील असून, त्या खालोखाल युरोपियन आणि चीन-जपानच्या संशोधकांचा क्रमांक लागतो. भारतातही विशेष करून राष्ट्रीय संशोधन संस्थामध्ये कार्यरत शास्त्रज्ञांचा संख्या या यादीत सर्वाधिक दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

SCROLL FOR NEXT