university senate election sakal
पुणे

Pune : विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीसाठी अण्णासाहेब मगर केंद्रावर २५.९४ टक्के मतदान

मतदान प्रक्रियेला वेळ लागत असल्याने दिवसभर या केंद्रावर रांग दिसत होती

कृष्णकांत कोबल ------------------------

हडपसर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीसाठी येथील अण्णासाहेब मगर मतदान केंद्रावर २५.९४ टक्के पदवीधर मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी लक्षात घेता मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे दिसून आले. मतदानकक्षात पसंतीक्रमांकानुसार मतदान करताना प्रक्रियेला उशीर लागत असल्याने दिवसभर केंद्रासमोर रांग दिसत होती.

या मतदान केंद्रावर दोन मतदान कक्ष होते. एकूण १८५० मतदारांच्या मतदानाची व्यवस्था येथे करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेला वेळ लागत असल्याने दिवसभर या केंद्रावर रांग दिसत होती. अनेक मतदार त्यामुळे माघारी गेले. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते, पक्षाचा पाठिंबा असलेल्या पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते दिवसभर केंद्राबाहेर थांबून मतदारांना मतदानासाठी येण्याबाबत प्रयत्न करीत होते. एवढे प्रयत्न करूनही केवळ ४८० मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.

"येथील केंद्रावरील १८५० पैकी ४८० मतदारांनी मतदान केले. त्यातील "अ' खोलीत ९१७ पैकी २५३ तर, "ब' खोलीत ९३३ पैकी २२७ मतदारांनी मतदान केले,' अशी माहिती केंद्राध्यक्ष डॉ. प्रशांत मुळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT