Pune University started ICAC course for students want to join civil services
Pune University started ICAC course for students want to join civil services 
पुणे

UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; पुणे विद्यापीठ करणार मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  तीन वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम (ICAC) अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याची २०२०-२१ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत चालवला जातो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पध्द्तीने शिकवला जाणार असून, २०२०-२१ साठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये ८० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणि २० टक्के ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे, अशी माहिती प्रा. सी. आर. दास यांनी दिली. 

या अभ्यासक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन पातळ्यांवर तयारी करून घेण्यात येईल. लेखन सराव, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषेवर प्राविण्य मिळवण्याकरिता कार्यक्रम, वादविवाद कार्यक्रम, चर्चासत्र, वेबिनार या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे. 

शेतकऱ्यांनो, भात पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी 'या' उपाययोजना करा...

प्रवेश घेण्यासाठी https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या लिंकवरून अर्ज भरवा.  अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ०२०-२५६२१८४१/४२ या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा cec@unipune.ac.in यावर ईमेल करावा. 


अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये 
- प्रवेश क्षमता ६०
- वार्षीक शुल्क २५ हजार
- एसपीपीयू मूडल लर्निंग ऍप्लिकेशन 
लाईव्ह लेक्चर्स 
-व्हिडीओ लेक्चर्स, डिजिटल ग्रंथालय 
- विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी विशेष सत्र 
- ऑनलाईन पध्द्तीने लेखनाचा सराव व मूल्यमापन 
- विद्यापीठातील प्राध्यापक आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT