savitribai phule pune University esakal
पुणे

Vice Chancellor : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची मुलाखत अंतिम टप्प्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून शुक्रवारी (ता.१९) मुलाखतीचा अंतिम टप्पा आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून शुक्रवारी (ता.१९) मुलाखतीचा अंतिम टप्पा आहे. कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या २७ उमेदवारांची मुलाखत गुरूवारी आणि शुक्रवारी पार पडत आहे. आता यातू पाच उमेदवारांची नावे निवडून राज्यपालांकडे पाठवली जातील. या पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर साधारणपणे मे महिना अखेरीस किंवा जून महिन्यात विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले कुलगुरू पद भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे विद्यापीठातीलच सध्या कार्यरत असलेल्या ११ जणांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला आहे. विद्यापीठातील काही उमेदवारांच्या मुलाखती गुरूवारी झाल्या असून उर्वरित उमेदवार शुक्रवारी मुलाखतीला जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहेत निकष?

कुलगुरू पदाच्या पात्रतेचे निकष उपलब्ध आहेत. प्राध्यापक म्हणून दहा वर्षे काम केलेल्या व्यक्तीला कुलगुरू पदासाठी अर्ज करता येतो. परंतु, संबंधित उमेदवाराचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव तपासला जातो. उमेदवाराने आत्तापर्यंत कोठे काय काय केले आहे? हे पाहिले जाते. वेब ऑफ सायन्स वरील व गुगल स्कॉलर साईटेशन, एच इंडेक्स, पब्लिकेशन्स आदी माहिती सुद्धा लक्षात घेतली जाते. उमेदवाराच्या नावे असणारे पेटेन्ट, विद्यापीठांच्या अधिकार मंडळावर केलेल्या कामाचा अनुभव, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विशेष उपक्रम, रिसर्च प्रोजेक्ट, उमेदवाराचा सोशल अवेअरनेस आदी गोष्टी मुलाखती दरम्यान पाहिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचे ‘म्युल अकाउंट’ रडारवर; पुणे पोलिसांची मोठी मोहीम; आठ दिवसांत १०० हून अधिक गुन्हे दाखल

Madhuri Elephant Return To Nandani Math : 'माधुरी हत्तीणी'च्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता! 13 सप्टेंबरची 'डेडलाईन'; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Live Marathi News Update : २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलनाचा इशारा; मनोज जरांगे यांची मोठी घोषणा

Mallikarjun Kharge Warrant : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने जारी केले वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण?

पीएचडी स्कॉलर ज्योतीचा विद्यापीठ कॅम्प्समध्ये शॉक लागून मृत्यू; कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई आणि भावाला नोकरीची घोषणा

SCROLL FOR NEXT