Pune University will conduct 50 marks examination for one and a half hours 
पुणे

पुणे विद्यापीठ परीक्षा कशी घेणार यावर शिक्कामोर्तब का?

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा केलेली नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. या नवीन परीक्षांच्या प्रस्तावास शनिवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये दीड तासाची 50 गुणांची परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

'कोरोना'मुळे विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा रद्द केल्या असून, त्यांना अंतर्गत मुल्यांकनावर पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. तर अंतीम सत्र/वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठाने यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने लेखी परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विद्या परिषदेच्या बैठकीत या परीक्षा कशा पद्धतीने द्यायचा याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास मान्यता देण्यात आली. 

अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे बॅकलाॅगचे पेपर 1 ते 15 जुलै या कालावधीत होणार आहे. महाविद्यालय स्तरावरच याचे प्रश्नसंच काढून महाविद्यालयातच पेपर तपासले जाणार आहेत. 16 ते 31 जुलै या दरम्यान अंतीम वर्षाची नियमित परीक्षा होणार आहे. यामध्ये विद्यापीठाने पेपर काढून ते महाविद्यालयांना पाठविले जाणार आहेत. 50 गुणांची परीक्षा दीड तासात घेतली जाईल. या उत्तरपत्रिका महाविद्यालय स्तरावरच तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकर उत्तरपत्रिका तपासणी करून निकाल वेळेत लावता येणार आहे. 

पुरवणी परीक्षेची तयारी पुणे विद्यापीठात महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेतच, पण परप्रांतातील व परदेशातील विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. हे सर्व विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात परीक्षांसाठी येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित रहाणार नाही. तसेच पुण्यात येऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर त्यांना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सोईचे केंद्रही निवडता यावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

"अंतीम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही व सोशल डिस्टंन्स ठेऊन परीक्षा घेता याव्यात याचे नियोजन केले आहे." 
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

Daund Theft : पोलिस निरीक्षकाच्या बंगल्यात चोरी! १२.८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड गेली चोरीला

36 वर्षांपासून तोच दिनक्रम; रिटायरमेंटबाबत अक्षय कुमारने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT