Dr Baba Adhav Sakal
पुणे

पुणे विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घ्यावी - डॉ. बाबा आढाव

विद्यापीठ येथील संविधान स्तंभ येथे भरमसाठ शुल्कवाढीविराधात बैठक आयोजित करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

विद्यापीठ येथील संविधान स्तंभ येथे भरमसाठ शुल्कवाढीविराधात बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे - स्वातंत्र्याच्या वेळी आम्हाला मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षणाचे माहेरघर आहे. विद्यापीठातील शुल्कवाढ हा अन्याय आहेच, ती मागे घेतलीच पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

विद्यापीठ येथील संविधान स्तंभ येथे भरमसाठ शुल्कवाढीविराधात बैठक आयोजित करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, ॲड. भाऊसाहेब आजबे, राहुल डंबाळे, सचिन पांडुळे, नवनाथ मोरे, निश्चय साक्षात साधना, प्रा. सुरेश देवढे, ओंकार मोरे आदींनी शुल्कवाढी विरोधात मत व्यक्त केले.

ॲड सरोदे म्हणाले, ‘विद्यापीठ हे कमाई करण्याचे साधन नाही. शिक्षण ही वस्तू नाही, त्यामुळे त्याचे बाजारीकरण करण्याचा निषेध केला पाहिजे. शुल्कवाढ करणे हे षडयंत्र असेल तर ते लढले पाहिजे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकताच येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. विद्यापीठाच्या बाबतीत सुद्धा शुल्क निर्धारण समिती असली पाहिजे. शुल्कवाढ चुकीची नसेल तर विद्यापीठाने स्पष्ट करावे.’ अक्षय निर्मळ याने सूत्रसंचालन तर वैष्णवी पाटील हिने आभार मानले. ओम बोदले आणि पौर्णिमा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT