Pune news esakal
पुणे

Pune : पुणे विद्यापीठाचा एक जानेवारीचा पेपर पुढे ढकलावा; पालक व विद्यार्थ्यांची मागणी

एक जानेवारी रोजी पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास देशभरातून लाखो अनुयायी येतात

सकाळ डिजिटल टीम

वाघोली : एक जानेवारी रोजी पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास देशभरातून लाखो अनुयायी येतात. यामुळे पुणे - नगर महा महामार्गावरील  रस्तेही वाहतुकीसाठी बंद असतात. याच दिवशी वाघोलीतील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी वर्गाची परीक्षा दोन सत्रात ठेवण्यात आली आहे. त्या दिवसाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत.           

31 जानेवारी रात्री मध्यरात्री पासूनच पुणे नगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येते. तर एक जानेवारी रोजी सकाळी 10 नंतर वाघोली ते कोरेगाव भीमा पर्यंत रस्ते गर्दी मुळे बंद होतात. वाघोली येथील महाविद्यालयात वाघोली ते शिक्रापूर परिसरात राहणारे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. एक जानेवारी रोजी पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्गाचे दोन सत्रात पेपर आहेत. या परीक्षेला गर्दी मुळे व रस्ते बंद असल्याने विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येईल की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. परिणामतः ते परीक्षेस मुकु शकतात. यामुळे या दिवसाची परीक्षा रद्द करून ती पुढे ढकलावी अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांची आहे. तसे पत्र महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागास दिल्याचेही कळते.

" महाविद्यालयांकडून तसे पत्र आले आहे. मात्र केवळ काही महाविद्यालयासाठी त्या दिवसाची परीक्षा मागे पुढे करता येणार नाही. त्या महाविद्यालयांनी दुसऱ्या महाविद्यालयात परीक्षा ठेवाव्यात. नाहीतर ज्या विद्यार्थ्यांना एक जानेवारीच्या गर्दी किंवा रस्ते बंद मुळे परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही. त्यांची विशेष परीक्षा घेता येईल."

- गोकुळदास लोखंडे, प्रशासकीय अधिकारी,परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : इशान किशनने पाकड्यांना टप्प्यात घेऊन ठोकले; अभिषेक शून्यावर गेला म्हणून नाचले होते, रोहितचा जल्लोष

Kalamb Crime : मित्रानी दारू पाजून खून केल्याची घटना उघड; येरमाळा पोलिसांनी पाच संशयितना केली अटक

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

VIDEO : भाईचा नाद करायचा नाय...रोहित शर्मा टीम इंडियाला चिअर करण्यासाठी चार्टर्ड प्लेनने कोलंबोत दाखल

Vadigodri News : वडीगोद्रीत स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न, चोरीचे साहित्य पोलीसाकडुन जप्त

SCROLL FOR NEXT