mall esakal
पुणे

Pune Unlock: पुण्यात मॉल सुरु, पण प्रशासनाची एक अट

कार्तिक पुजारी

Pune Unlock corona guidelines पुणे- पुण्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत होते. अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाल्याचं कळतंय. मॉलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात मॉल सोमवारपासून सुरु असतील, पण लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार आहे. रात्री आठवाजेपर्यंत मॉल सुरु राहणार आहेत. (Pune Latest News)

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दुकानांच्या वेळेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळ ते रात्री सुरु राहणार आहेत. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल, जलतरण तलाव यासाठी सुद्धा नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणचा समावेश लेवल ३ मध्ये आहे. कोरोना निर्बंधातून सूट देण्यात येत असली तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध पुन्हा लावणार असल्याचं पालकमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे पुणेकरांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. असे असले तरी निर्बंधातून सूट देण्यात आली असल्याने नागरिक, व्यापारी, दुकानदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा निर्बंध लादण्यात येणार आहेत. लोकांच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्यात येईल. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. पुण्याकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT