Murlidhar MOHOl sakal
पुणे

पुणे सोमवारपासून अनलॉक; महापौरांची माहिती

सूरज यादव

सोमवारपासून पुणे अनलॉक होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल न केल्यानं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबईला आणि पुण्याला वेगवेगळी वागणूक दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असून निर्बंध शिथिल करा अशी मागणी त्यांनी केली होती. आता ही मागणी मान्य झाली असून सोमवारपासून पुणे अनलॉक होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. कोरोनाबाबात आढावा बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी असणार आहे. तसंच मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्याची अट ठेवली आहे.

पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत खाली !

गेल्या पाच आठवड्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट सातत्याने घटत असून ४ ते १० जुलै या आठवड्यात ४.९८ टक्के असणारा पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी आज केली होती असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT