Ajit Pawar Sakal
पुणे

पुणे : निर्बंध शिथिल, सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील अशी माहिती बैठकीत दिली.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे पुण्यात मोठं नुकसान होत होतं. याबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील अशी माहिती दिली आहे. तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहतील असेही त्यांनी सांगितले. आठवड्याची कोरोना आढावा बैठकीत असा निर्णय झाल्याचं समोर आलं आहे. बैठकीनंतर याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. सोमवारपासून सर्व दुकाने सर्व दिवशी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. कोरोना लशीचे दोन डोस झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल असं अजित पवार यांनी सांगितलं. मॉल हॉटेल जलतरण तलाव यासाठी सुद्धा नवी नियमावली लागू केली जाणार आहे. पुणे ग्रामीण सुद्धा लेवल 3 वर आहे. निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचंही ते बैठकीत म्हणाले.

पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत खाली !

गेल्या पाच आठवड्यात पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट सातत्याने घटत असून ४ ते १० जुलै या आठवड्यात ४.९८ टक्के असणारा पॉझिटिव्हीटी रेट २.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी आजही केली असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT