लसीकरण  sakal
पुणे

पुणे : लसीकरण केंद्रावरील कर्मचारी पगारच्या प्रतिक्षेत

पगार नसल्याने काम सोडून गेल्याने ऐनवेळी पर्यायी कर्मचारी शोधण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लसीकरण केंद्रावर मांडव, संगणक, फर्निचर पुरविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, या केंद्रावर डेटएंट्रीचे काम करणारे ९२ कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगाराच्या प्रतिक्षेत आहे. पगार नसल्याने काम सोडून गेल्याने ऐनवेळी पर्यायी कर्मचारी शोधण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागली.(Pune Vaccination Employee Payment Updates)

महापालिकेने नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरात सुमारे १९० केंद्र सुरू केले आहेत. याठिकाणी डॉक्टर, नर्स आणि डेटाएंट्री आॅपरेटरची नियुक्ती केली आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी वाढण्यास सुरवात झाली. तसेच कोव्हीशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र होणाऱ्यांचे प्रमाण नोव्हेंबर महिन्यांपासून सुरवात झाली. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर पुन्हा गर्दी होत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लसीकरण केंद्रांसाठी पुरेसे डेटाएंट्री आॅपरेटर नसल्याने प्रशासनाने मिळकतकर विभागाकडील कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आला. ९२ कर्मचारी विविध केंद्रांवर काम करत असताना त्याच वेळी त्यांचा पगार आरोग्य विभागाकडून काढणे अपेक्षीत होते. त्यासाठी तरतूद उपलब्ध करून देऊन आयुक्तांची मान्यता घेणेही आवश्‍यक होते. मात्र, ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

गेल्या तीन महिन्यांपासून ९२ कंत्राटी कामगारांना पगार नसल्याने त्यांची याबाबत पाठपुरावा सुरू केला. पण त्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे हे कर्मचारी वैतागून काम सोडत असल्याने लसीकरण केंद्रावरील काम विस्कळित होत आहे.

याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, पगार नसल्याने डेटाएंट्री आॅपरेटर काम सोडून जात आहेत यात तथ्य असले तरी आम्ही लगेच पर्यायी व्यवस्था उभी करत आहोत. या कर्मचाऱ्यांना पगार देण्याची फाइल आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर नोव्हेंबरपासूनचा थकीत पगार दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT