Municipal Commissioner Vikram Kumar Sakal
पुणे

TP Scheme : वडगाव शेरीतील टीपी स्कीमला शहर सुधारणाची मान्यता

पुणे महापालिका हद्दीत वडगावशेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिका हद्दीत वडगावशेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली.

पुणे - वडगाव शेरी परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी जागा मालक जागा देत नसल्याने व त्याचा परिणाम या परिसरावर होत असल्याने अखेर या ठिकाणी नगररचना परियोजना (टीपी स्कीम) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास आज आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये मंजुरी दिली.

पुणे महापालिका हद्दीत वडगावशेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली. पण गेल्या १५ वर्षात वडगाव शेरीचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. उलट वडगाव शेरी वगळता या भागातील इतर परिसरात मोठे रस्ते झाल्याने विकास झाला आहे. २००७ पासून वडगावशेरीतील जागा मालक रस्त्यासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादन करण्यास तयार होत नाहीत. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

या गावामधील रस्ते विकसित करून टीपी स्कीम राबविणे आवश्यक असल्याने वडगावशेरीतील सर्वे क्रमांक १७ /१ /३ब , १०/४ , ११/ १ /२ / ३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टीपी स्कीम करावी अशी मागणी माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्याला शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT