Pune Accident sakal
पुणे

Pune Accident : वालचंदनग येथे दोन अपघातामध्ये तिघांचा मृत्यू...

अपघातानंतर चालक चारचाकी वाहनासह पळून गेला

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : जंक्शन व शेळगाव ( ता.इंदापूर) येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आज सोमवार (ता.३) जंक्शनमध्ये कळस रस्त्यावरील खर्जुलवस्तीवर ९ वाजण्याच्या चारचाकी गाडीने सायकलस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे (वय ५२,रा.भरणेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालक चारचाकी वाहनासह पळून गेला. शेळगावामध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास क्रेन व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये बाबुराव जगन्नाथ कोकरे (वय ७०),व संजय रखमाजी कुंभार (वय ४९, रा. दोघे टाकळी ता. माढा जि.सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे.बाबुराव कोकरे हे पाटस

येथील साखर कारखान्यामधील सेवानिवृत्त कर्मचारी असून पेन्शनच्या कामासाठी दुचाकीवरून पाटसकडे निघाले असताना शेळगाव मध्ये क्रेन चालकाची क्रेन भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आल्यामुळे समोरासमोर अपघात झाला. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT