Pune valley traveling vehicles accident 
पुणे

घाटांतून करा..बिनधास्त प्रवास!

वाहने दरीत कोसळण्यास पायबंद; पुण्यातील लडकत यांचे संशोधन

संजय नवले

पुणे : घाटात अवघड वळणांवर वाहने दरीत कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यावर ‘न्यूटनच्या गतीविषयक सिद्धांता’चा आधार घेत पुणे शहरातील मुंढवा परिसरातील एका अवलियाने उपाय शोधला आहे. त्यांच्या या संकल्पनेला भारत, अमेरिका, जपान, चीन व ऑस्ट्रलियाचे पेटंट मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात वाहनचालकांना घाटातून बिनधास्त प्रवास करणे सुकर होणार आहे.

गिरवलीतील डोंगरावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याची घटना नुकतीच घडली. अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडतात. यावर उपाय शोधत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात वीस वर्षांपासून काम करणारे अभियंता राजेंद्र लडकत यांनी न्यूटनच्या जडत्वावर आधारित या सिद्धांताचा उपयोग करीत ‘प्रीकास्ट ‘H’, ‘Y’ ब्लॉक विथ रोप’ या पद्धतीचा वापर करीत त्यांनी एक मॉडेल बनविले आहे.

रायगड जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबेनळी घाटात बाउली या गावाजवळील अपघातप्रवण वळणावरचा भाग चाचणीसाठी दिला आहे. राजेंद्र व त्यांच्या पत्नी माधुरी या दोघांनी तेथेच तंबूत राहून स्थानिक लोकांकडून ते काम मार्च व एप्रिल महिन्यात पूर्ण केले आहे.

काय आहे मॉडेल

  • घाटामध्ये H ब्लॉकने तिरकी व Y ब्लॉकने उभी भिंत बांधता येते.

  • H व Y ब्लॉकमधून असणाऱ्या होलमधून जाणाऱ्या वायर रोपने दोन्ही बाजूला खिळ्यांच्या साह्याने भिंतीला आधार दिला जातो.

  • ब्लॉकमधून जाणारा वायर रोप रस्त्याच्या विरुद्ध बाजूस ताणून खिळ्यांच्या साह्याने रस्त्याच्या खालून नेऊन बसवला जातो

  • एखाद्या वाहनाने जरी अवघड वळणावरील या भिंतीला धडक दिल्यास त्याचा आघात रस्त्याच्या विरुद्ध बाजूस जाऊन वायर रोपमुळे तो आघात इतर ब्लॉकमध्ये पसरला जातो व संपूर्ण भिंत सुरक्षित राहते. याशिवाय या भिंतीला टायर लावल्याने होणाऱ्या आघाताची तीव्रता कमी होते

  • H व Y आकाराचे ब्लॉक फॅक्टरीत बनविल्यास हे काम एका दिवसात पूर्ण होते

  • रोलिंगची पद्धत कमी खर्चिक असून तीन फुटांसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येतो

  • वाहनाचा वेग व वजन कितीही असले तरी स्टीलच्या रोपची जाडी वाढवून ते सहज पेलता येते. कारण, स्टीलचा रोप कित्येक टन वजन सहज पेलू शकतो व तो लवचिक असतो

  • जर जमीन ठिसूळ असल्यास किंवा मातीचा पोत हलका असल्यास तेथे कॉंक्रिटचे हलके ब्लॉक व स्टील फायबरचा वापर केला जातो.

घाटातील धोकादायक वळणावर प्रीकास्ट ‘H’ व ‘Y’ ब्लॉक पद्धतीचा वापर केल्यास वाहन दरीत कोसळणार नाही. त्यामुळे निश्चितच जीवितहानी टळू शकते.

- महेश रामहरी नामदे,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड

लखनौत ८ ते ११ ऑक्टोबरला झालेल्या ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या परिषदेमध्ये या कामाचे सादरीकरण केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची आम्ही तीन वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र भेट होवू शकली नाही. लवकरच त्यांना भेटून हे मॉडेल सादर करणार आहे.

- राजेंद्र लडकत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT