PUNE
PUNE SAKAL
पुणे

वाळुंज ग्रामस्थांना मिळाली प्रॉपर्टीची सनद , राज्यात पहिलाच उपक्रम

योगेश कामथे

खळत : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाण भूमापन सर्वेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील वाळुंज (ता.पुरंदर) येथील गावाचे सर्वेक्षण करण्यात आले असून भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांच्या हस्ते येथील नागरिकांना आपल्या प्रॉपर्टीची अधिकृत सनद वाटप करण्यात आली.

या योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या ड्रोन द्वारे सर्वेक्षण कार्यक्रमाची पाहणी सोमवारी केंद्र व राज्य सरकारच्या पथकाद्वारे करण्यात आली. यावेळी या गावचा अधिकृत नकाशा प्रकाशित करीत प्रातिनिधिक स्वरूपात दत्तात्रय निवृत्ती म्हेत्रे, अर्जुन अनंता चौरे, फकीर कृष्णा इंगळे ,सुमन वसंत पवार, शांताराम कृष्णा म्हेत्रे यांना त्यांच्या प्रॉपर्टीची सनद देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेख संचालक तथा जमावबंदी आयुक्त एन. के. सुधांशु, पुणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे प्रदेशचे भूमि अभिलेख उपसंचालक किशोर तवरेज,जिल्हा अधिक्षक सूर्यकांत मोरे, वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार,तहसीलदार रूपाली सरनोबत,उपअधीक्षक भूमिअभिलेख पुरंदर विकास गोफणे,सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते,सर्व्हे ऑफ इंडियाचे त्रिपाठी, मंडलाधिकारी प्रभावती कोरे ,तलाठी सोमशंकर बनसोडे, भूमापक नानासाहेब कांबळे, प्रितम बनकर ,अनिल नंद, हरिभाऊ गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने ड्रोन सर्वेची सुरूवात पुरंदर तालुक्यातील सोनारी गावातून केली व हीच योजना केंद्राने स्विकारत हा उपक्रम राबविला व त्यातूनच सुपे व वाळुंज या गावचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्यात प्रथमच शेतकऱ्यांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड देण्यात आली व यामुळे शेतकरी सशक्त होऊन विकासाचे नवीन पर्व सुरू होईल, सरकारच्या विविध भूसंपादन प्रक्रिया मध्ये भूसंपादन होत असताना याला विशेष महत्व असून जमिनीची किंमत वाढणार असून शेतकऱ्यांना वाढीव पैसे मिळतील व या योजनेमुळे शेतकरी आनंदी असल्याचे मत सुनील कुमार यांनी व्यक्त केले तर गावठाण क्षेत्राला याचा लाभ होणारच आहे पण दुकानदारानांही याचा लाभ होईल त्यांचे जीवनमान उंचावेल त्यांना मुद्रा लोन चा फायदा मिळेल असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे,सरपंच कैलास मेत्रे,ग्रामसेवक विलास बडदे,उपसरपंच योगिता इंगळे,अनिल इंगळे,अंकुश इंगळे,नरेंद्र इंगळे,रेश्मा चवरे, सुप्रिया इंगळे, कैलास फ. इगळे,ज्ञानेश इंगळे,प्रशांत मेत्रे,लक्ष्मण म्हेत्रे, राहुल म्हेत्रे, विकास म्हेत्रे यांनी केले.

" हा उपक्रम गावात राबविल्यामुळे गावातील नागरिकांना मोठा फायदा झाला असून त्यांना त्यांचे क्षेत्र समजले, गावामध्ये क्षेत्रावरून सतत होणारे वाद थांबले, आता त्यांच्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड त्यांच्याकडे असल्याने जमिनीची मूल्यांकन वाढले व बँकेमध्येही त्यांच्यासाठी कर्ज प्रक्रिया सुलभ होऊन त्यांचा सन्मान होऊ लागला असल्याचे नियोजन समिती पुणेचे माजी सदस्य रमेश इंगळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT