पुणे

टोमॅटो, शिमला, काकडी, फ्लॉवरच्या भावात घट

CD

मार्केट यार्ड, ता. १ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने टोमॅटो, शिमला, काकडी, फ्लॉवर, घेवडा, मटार भावात १० टक्क्यांनी घसरण झाली होती. तर मागणी जास्त असल्याने हिरवी मिरचीच्या भावात वाढ झाली होती. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १४ ते १४ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे ८ ते १० टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ ते ५ टेम्पो, भुईमूग कर्नाटक आणि गुजरातमधून प्रत्येकी २ टेम्पो, मध्यप्रदेश, राजस्थानातून मटार २५ ते २६ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, काकडी ८ ते १० टेम्पो, फ्लॉवर १० ते १२, ढोबळी १२ मिरची, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो गाजर २ ते ३ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, कांदा सुमारे १२५ टेम्पो आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १००-१५०, बटाटा : ८०-१४०, लसूण : ५००-११००, आले सातारी : ३५०-५५०, भेंडी : ३००-४५०, गवार : ७००-१०००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : ५००-७५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १६०- २००, कारली : हिरवी ४००-४५०, पांढरी : २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-२००, कोबी : ८०- १४०, वांगी : २५०-४५०, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : १००- १२०, ढोबळी मिरची : ३००- ४००, तोंडली : कळी : ४००-४५०, जाड : २००-२५०, शेवगा : ५००-८००, गाजर : १५०-२००, वालवर : १५०-२००, बीट : ८०-१२०, घेवडा : २००-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ६००-९००, मटार : परराज्य मटार : १८० ते २५०, पावटा : ३५०- ४००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १८००-२०००, सुरण : २००- २२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

कोथिंबिरीची एक लाख जुडींची आवक
कोथींबीर, मेथी शेपूसह अन्य सर्वच पालेभाज्यांचे भावात शेकड्यामागे ५ ते १० टक्क्यांनी घट झाली माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ८० हजार जुड्यांची तर हरभऱ्याची सुमारे १२ हजार जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ५००-८००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८०००- १२००, चाकवत : ५००-८००, करडई : ४००-७००, पुदिना : ३००-६००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१५००, हरभरा गड्डी ५००-१२००

कलिंगड, पपईच्या भावात वाढ
पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात कलिंगड, पपईच्या भावात वाढ झाली असून संत्र्यांच्या भावात घसरण झाली आहे तर मोसंबी, बोरे, डाळिंब, खरबूज, अननस, चिक्कू, लिंबू आणि पेरूचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (ता. १) फळबाजारात मोसंबी ४५ ते ५० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १५ ते १६ टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ८ ते १० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, चिक्कू २ हजार गोणी, पेरू ३०० तर ३५० क्रेट, अननस ६ ट्रक, बोरे ३५० ते ४५० पोती, इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-४००, मोसंबी : (३ डझन) : १००-५००, (४ डझन) : २८०, संत्री : (१० किलो) : २५०-९००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १००-३००, आरक्ता : २०-१००, गणेश : १०-४०, कलिंगड : १२-२५, खरबूज : १५- २५, पपई : १२-३०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू, (२० किलो) : ६००-७००, अननस (१ डझन): १००-६००, बोरे (१० किलो) : चमेली ३५०-४५०, चेकनट ८००-१०००, उमराण १००-१२०, चण्यामण्या १०००- १२००.

बहुतांश फुलांचे भाव घटले
प्रजासत्ताक दिनानंतर सुट्ट्यांचा काळ संपल्याने फुलांना मागणी घटली आहे. त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. बहुतांश फुलांचे भाव रविवारी घटले होते. तर कटलॉवरचे दर टिकून असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
झेंडू : १०–३०, गुलछडी : ४०–६०, अ‍ॅष्टर : जुडी ६–१०, सुट्टा ५०–७०, कापरी : २०–५०, शेवंती : ४०–७०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १५–२५, गुलछडी काडी : २०–५०, डच गुलाब (२० नग) : १५०–३००, जर्बेरा : ३०–५०, कार्नेशियन : १५०–१८०, शेवंती काडी : २००–३५०, लिलियम (१० काड्या) : ८००–१,०००, ऑर्चिड : ५००–६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०–१००, जिप्सोफिला : ३००–५००, लिली बंडल : ८–१०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT