पुणे

पणे - बाजारभाव - १७ मे २०२६

CD

पुणे बाजार समितीत फळभाज्यांची आवक स्थिर

आले, टोमॅटो, काकडी आणि घेवड्याच्या दरात सुधारणा; पालेभाज्यांतही तेजी कायम

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१७) फळभाज्यांची आवक गेल्या आठवडयाच्या तुलनेने स्थिर होती. उन्हामुळे फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात मागणी जास्त असल्याने आले, टोमॅटो काकडी, घेवड्याच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. उर्वरित सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

विविध भाजीपाल्यांच्या आवकेत राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. यामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, कोबी कर्नाटकातून कोबी ४ टेम्पो, घेवडा ३ टेम्पो, आणि भुईमुंग शेंगा१ टेम्पो, गाजर इंदौर येथुन ५ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ तर तोतापुरी कैरी ५ टेम्पो, हिमाचल येथून मटार ८ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० टेम्पो तर इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४५० गोणी, भेंडी ६ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ८ हजार क्रेट, हिरवी मिरची २ टेम्पो, काकडी ७ टेम्पो, फ्लॉवर १०, कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, गाजर १० टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, घेवडा, पावटा २ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमुंग शेंग १५० गोणी, कांदा सुमारे ८० टेम्पो आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ८०-१२०, बटाटा : १००-१५०, लसूण : ६५०- १५००, आले सातारी : ५००-७००, भेंडी : २००-४००, गवार : ४००-६००, टोमॅटो : १५०-३००, दोडका : ४००-५००, हिरवी मिरची : ३५०-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी :२५०-३००, काकडी : २५०- ३००, कारली : हिरवी ३००-४००, पांढरी : २००- २५०, पापडी : ४००-५००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ८०- १००, वांगी : २००-४००, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ४५०- ५००, तोंडली : कळी : ३००-४००, जाड : १५०-२००, शेवगा : २५०-३५०, गाजर : १५०-२००, वालवर : ५००-६००, बीट : १६०-१८०, घेवडा : १२००-१४००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २५०-३००, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : परराज्य: ५००-६००, पावटा : ७००-८००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १५०-२५०, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
--------
कोथिंबीर, मेथी तेजीतच
उन्हामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असून, उत्पादनात घट झाल्याने तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक घटली होती. तर मागणी जास्त असल्याने कोथिंबीर, मेथी शेकडा गड्डीमागे ५०० ते १००० रुपयांनी वाढ झाली होती. विविध पालेभाज्यांच्या आवकेत कोथिंबीर सुमारे ९० हजार जुडी, तर मेथीची ३५ हजार जुडयांची आवक झाली होती.

पालेभाज्यांचे शेकडयातील भाव : कोथिंबीर : २०००-३००० , मेथी : १५०० ते २५००, शेपू : ५००- १०००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-१०००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ५००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-१०००, चुका : ५००-१२००, चवळई : ५००-१०००, पालक : १५००-२०००.
--------------
फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ८०-१२०, अ‍ॅष्टर : जुडी १०-२०, सुट्टा १००-१५०, कापरी : २०-५०, शेवंती : ५०-१३०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २०-३०, गुलछडी काडी : २०-८०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) १०००-१५००, ऑर्चिड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१३०, जिप्सोफिला : १५०-३००, लीली बंडल : ५-६, मोगरा : २००-३००.
---------
फळबाजार
फळबाजारात रविवारी (दि.१७) लिंबू १००० गोणी, मोसंबी १५ टन, संत्रा १ टन, डाळिंब २५ टन, पपई १० टेम्पो, कलिंगड ५० टेम्पो, खरबूज २ टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी, पेरु २०० क्रेट, आणि हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेटी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते १२००, मोसंबी : (३ डझन) : १८०-४५०, (४ डझन) : १००-२८०, संत्रा : (१० किलो) : ३००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-३०, कलिंगड : ७- १२, खरबूज : २०-३५, पपई : ५-२०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरु (२० किलो) : ३००-७००, अननस (१ डझन): १००-६००, रत्नागिरी हापूस ५ ते ९ डझन (कच्चा) : १२००-२०००, रत्नागिरी हापूस ५ ते ९ डझन (तयार) : १५०० ते ३०००. कर्नाटक आंबा ००००
------------
फोटो ओळी
पुणे - गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१७) झालेली ब्याडगी मिरचीची झालेली आवक.ब्याडगी मिरचीला ७० ते ८० रुपये किलोला दर मिळाला. (दुसऱ्या छायाचित्रात) काकडी, वांग्याची झालेली आवक. (तिसऱ्या छायाचित्रात) पालेभाज्यांची झालेली आवक.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१७) झालेली उन्हाळी भुईमुगाची झालेली आवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT