बेड्या sakal
पुणे

पुणे : वाहनचोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; लष्कर पोलिसांची कामगिरी

लष्कर पोलिसांची कामगिरी : एक लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : वाहनचोरी करणाऱ्याला लष्कर पोलिसांनी अटक करून चार मोटारसायकल असा एकूण एक लाख १०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील शासकीय ७ आणि खासगी १२ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सरफाज इकबाल मोमीन (वय २५, रा. आलीफ टॉवरजवळ, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या वाहनचोराचे नाव आहे.

लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना संशयित आरोपी सोलापूर बाजार, कॅम्प येथे हिरोहोंडा स्पेंडर घेऊन थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता तीन-चार दिवसापूर्वी कॅम्पमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत आरोपीकडे तपास केला असता त्याने तीन दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. लष्कर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक डोंगळे, पोलीस हवालदार कदम, कोळी, मांजरे, तांबोळी, शिरगिरे, बोसले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

धक्कादायक ! ICU मधील वृद्ध महिला रुग्णाला उंदरांनी कुरतडले; रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड

IPL 2026 Marathi News: ना CSK, ना KKR... आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार? ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणाला?

SCROLL FOR NEXT