पुणे

थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत

CD

पुणे, ता. १४ : पुणे महापालिकेने थकबाकीदार आणि परवाना नूतनीकरण न करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून ३१ मेपूर्वी नूतनीकरण न केल्यास संबंधितांना काळ्या यादीत टाकून त्यांची व्यवसाय साधने जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा फेरीवाल्यांना पुढील पथविक्रेता सर्वेक्षणात सहभागी होता येणार नाही.

महापालिका हद्दीत सुमारे २१ हजार नोंदणीकृत पथारी व्यावसायिक असून त्यापैकी १८०० हून अधिक व्यावसायिकांकडे परवाना शुल्काची थकबाकी आहे. हजारो फेरीवाल्यांनी अद्याप व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे महापालिकेने सर्व नोंदणीकृत व पुनर्वसित फेरीवाल्यांना थकीत शुल्क भरून प्रमाणपत्र नूतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी एक जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, फेरीवाल्यांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने नगर पथविक्रेता समितीच्या सात एप्रिल २०२६ ला झालेल्या बैठकीत मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली.
महापालिकेच्या इशाऱ्यानुसार, मुदतीत नूतनीकरण न करणाऱ्यांना तसेच बायोमेट्रिक सर्वेक्षणात नोंद असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनाही काळ्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे. नूतनीकरण न झाल्यास संबंधितांचे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र रद्द समजले जाईल, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT