Vidya Pratishthan Baramati
Vidya Pratishthan Baramati  sakal
पुणे

Pune : बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2022-2023 या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शुक्रवारी (ता. 10) महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अँड.ए.व्ही. प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या सह त्याच्या टीमने हा पुरस्कार स्विकारला.

विदयापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत विद्यापीठाकडून दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पुरस्कारासाठी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या समितीने जानेवारीत महाविद्यालयाची पाहणी केली. ग्रामीण विभागातून महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहिर झाला.

तीन लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या तारांकीत महाविद्यालयासाठीही विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून तारांकीत महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे. यातून महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान विभागांना 1 कोटी 55 लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. याच विभागाकडून डीएसटी फिस्ट योजनेतून महाविद्यालयास 70 लाखांचे अनुदान मिळाले होते. रूसा अंतर्गत महाविद्यालयास 2 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, आयक्यूएसी समन्वयक निलिमा पेंढारकर, प्रा.निलीमादेवी, डॉ. जयश्री बागवडे डॉ. संजय खिलारे, नितीन सावंत आणि समितीतील इतर सर्व सदस्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट प्रस्तावामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. भरत शिंदे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT