school_bell esakal
पुणे

पुणे : ग्रामीण भागातील शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार

ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाचा हिरवा कंदिल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळांची घंटा येत्या सोमवारपासून (ता.६) वाजणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल २१ महिन्यांहुन अधिक काळ बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्याला पुणे जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या, दरम्यान ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य सरकारने शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑक्टोबरच्या सुरवातीपासून सुरू करण्यात आले.

दरम्यान राज्य सरकारने शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन एक डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या शाळा सुरू करण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाकडे सोपविली आहे. परंतु जगभरात कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे प्रामुख्याने राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील शाळांनी एक डिसेंबरपासून वर्ग सुरू न करण्याचा निर्णय त्या-त्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. पुणे महापालिकेने शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याला १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली असून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत पुढील आदेश देण्यात येईल, असे महापालिकेने जाहीर केले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याला मान्यता दिली आहे. कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT