Pune Crime News 
पुणे

पुण्यात विमाननगरातील खुनाचं उकललं गूढ; पूर्वीच्या वादावरुन तरुणाचा झाला खून

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुर्वी झालेली भांडणे व वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरुन महिलेसह चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खुन केला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विमाननगर परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने महिलेसह तिघांना अटक केली, तर विमानतळ पोलिसांनी एका आरोपीस बेड्या ठोकल्या. सनी गाडे, शबनम हानिफ शेख, मोहम्मद हुसेन मोहम्मद शरीफ कुरेशी व सलीम मुर्तजा शेख (चौघैही रा. लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर सुमीत दिलीप जगताप (वय 33, रा. कलवड, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी व सुमीत जगताप हे दोघेही मैत्री होती. संबंधीत महिलेसमवेत सुमीतचे काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती.

ही भांडणे मिटविण्यासाठी शनिवारी संबंधीत महिला व तिच्यासमवेत चौघेजण शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोहगावमधील खेसे पार्क येथे जमले होते. तिथे चौघांनी सुमीतला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रकरण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखीच वाद वाढले. सुमीतने महिलेस मारहाण केली. या प्रकारामुळे चिडलेल्या आरोपींनी लाकडी दांडक्‍यासह धारदार शस्त्रांनी सुमीतवर वार केले होते. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने सुमीतला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास सुमीतचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर महिलेसह चौघेजण पळून गेले. त्यावेळी विमानतळ पोलिसांनी या घटनेतील प्रमुख आरोपी सनी गाडे यास अटक केली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. त्याचवेळी संबंधित घटनेमध्ये शबनम शेख व तिचे साथीदार यांचा सहभाग असून ते खडकी येथील शासकीय दूध योजनेसमोरील रस्त्यावर "लेडी डॉन' असा उल्लेख असलेल्या कारमध्ये थांबले आहेत. ते तिथून लवकरच पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींना अटक करुन विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे सुमीतवर हल्ला करण्याबाबतची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी संबंधीत महिला व सुमीतमध्ये पुर्वी झालेली भांडणे मिटविताना पुन्हा झालेल्या वादातून हा खून घडल्याची कबुली दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT