स्वामी विवेकानंद मार्गावरील बस थांबे गायब Sakal
पुणे

बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्गावरील बस थांबे गायब

प्रवाशांना ऊन पावसात रस्त्यावर उभे राहून बस ची वाट पहावी लागत आहे.

नितीन बिबवे

बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्गावरील अनेक बस थांबे गायब झालेले असून प्रवाशांना ऊन पावसात रस्त्यावर उभे राहून बस ची वाट पहावी लागत आहे. विवेकानंद मार्गाच्या दोन किलोमीटर लांबी मध्ये दहा बस थांबे असून त्यातील शहरात जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही बाजूकडील सहा बस थांबे गायब आहेत.

विवेकानंद रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण चे काम सुरू असताना काही बस थांबे काढले आहेत ते अद्याप बसवलेले नाही, मार्गाच्या सुरवातीचा स्वारगेटहून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या प्रेम नगर सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, इंदिरा नगर, अप्पर कमान, अप्पर शेवटचा बस थांबा तर बिबवेवाडीहून स्वारगेटला येताना इ एस आय हॉस्पिटलचा बस थांबा गायब आहे.

बिबवेवाडीतून दररोज पंचवीस हजार प्रवासी शहरात जाणाऱ्या सात मार्गावरील बस मधून प्रवास करतात. शिवाजी नगर, पुणे स्टेशन, निगडी, कोथरूड, एन डी ए गेट, संगमवाडी याठिकाणच्या मार्गावर बस धावतात, परंतु बस थांबे नसलेल्या ठिकाणच्या प्रवाशांना उन्हात, पावसात थांबावे लागते. सुरेखा घुले ( प्रवासी, अप्पर ) : इ ऐस आय हॉस्पिटलमधून शहरात किंवा ओपीडी साठी सांगवी ला जावे लागते, परंतु येथे बस थांबा काढल्यामुळे रस्त्यावर थांबावे लागत आहे.

चिराग कदम ( विध्यार्थी प्रवासी ) : अप्पर बस डेपोतून बस येताना फुल्ल होऊन येतात त्यामुळे बस डेपोला जाऊन बस पकडावी लागते, परंतु बिबवेवाडी गावठाणाचा बस थांबा काढल्यामुळे बस कोठे थांबेल याचा नियम नसतो रस्त्यावर जाऊन बस पकडावी लागते.

दत्तात्रेय झेंडे ( वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल ) : लोकप्रतिनिधी च्या निधीतून अथवा बीओटी तत्वावर बस थांबे तयार करण्याचा विचार सुरू असून लवकरच त्यानुसार बस थांबे लावले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT