vocational education  
पुणे

व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाला अद्याप प्रतिक्षा

सकाळवृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे पालक विद्यार्थी यांचे डोळे लागले आहेत, मात्र, प्रवेशासाठी शिक्षण संस्था व सीईटी सेलची तयारी अपूर्ण असल्यानेआणखी किमान पाच ते सहा दिवस तरी प्रक्रिया जाहीर होण्यास लागणार आहेत. 

सीईटी सेलने इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, एमबीए, लाॅ यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.  त्यानंतर प्रवेशाची नियमावली जाहीर केलेली आहे. इंजिनीअरिंग प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मसी प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष, फार्मा डी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश, बॅचलर ऑफ प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दोन प्रवेश फेऱ्या  घेतल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना 300 महाविद्यालयांपर्यंत पसंतीक्रम देता येतील. पण दोनच फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना जेथे प्रवेश मिळेल तेथे जागा निश्चित करावी लागणार आहे. असे या नियमावलीमध्ये स्पष्ट केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी माहिती दिलेली होती. मात्र, पहिला आठवडा संपून देखील अद्याप याबाबत सीईटी सेलने प्रक्रिया जाहीर केलेली नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यातच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डाॅ. अभय वाघ यांनी नुकताच एक आदेश काढला आहे. त्यामध्ये शिक्षण संस्थांनी त्यांची विद्यार्थी क्षमता व इतर माहिती 'डीटीई'च्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यासाठी सात डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. जर महाविद्यालयांनी ही माहिती अद्ययावत केली नाही तर उपलब्ध माहितीवरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे या पत्रात नमूद केले आहे. 

महाविद्यालयाकडून आलेली माहिती सात डिसेंबरनंतर सीईटी सेल कडे पाठवले जाईल. त्यानंतर सीईटी सेल कडून सर्व माहितीचे व्यवस्थित तपासणी करून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे इंजिनिअरिंग सह इतर सर्व पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास आणखी पाच ते सहा दिवस तरी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT