पुणे

जिल्ह्यात २८ लाख मतदारांची घट

CD

पुणे, ता. ३१ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ९० लाख ८० हजार १७३ मतदारांची नोंद होती. मात्र प्रारूप मतदार यादीत ही संख्या ६२ लाख १३ हजार ६९२ असून, तब्बल २८ लाखांची घट झाली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. नाव नसल्यास नाव नोंदणीसाठी प्रपत्र ६, आक्षेपासाठी प्रपत्र ७, तर दुरुस्ती किंवा ईपीक कार्डसाठी प्रपत्र ८ भरता येईल. २००२ च्या यादीशी मॅपिंग नसलेल्या किंवा तपशिलात तफावत असलेल्या मतदारांची सहायक नोंदणी अधिकारी स्तरावर सुनावणी होईल. त्यानंतरच अंतिम यादीत नावाचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दावे व हरकतींवर २९ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करून ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये आणि pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते.


मतदार यादी : आकडेवारी एका नजरेत
पुरुष मतदार ३१ लाख ५१ हजार २९७
महिला मतदार ३० लाख ६२ हजार १२
तृतीयपंथी मतदार ३८३
एकूण मतदार ६२ लाख ११ हजार ९५०
एकूण मतदान केंद्रे ८ हजार ४२४
मतदान केंद्रांत वाढ ७

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे
मतदारसंघ केंद्रे
जुन्नर - ३५६
आंबेगाव - ३४४
खेड आळंदी - ३९३
शिरूर - ४५९
दौंड - ३१५
इंदापूर - ३३९
बारामती - ३८८
पुरंदर - ४१३
भोर - ५६७
मावळ - ४०२
चिंचवड - ५६०
पिंपरी - ३९७
भोसरी - ४९१
वडगाव शेरी - ४३८
शिवाजीनगर - २६६
कोथरूड - ३८७
खडकवासला - ५०२
पर्वती - ३४४
हडपसर - ५२५
पुणे कॅन्टोन्मेंट - २७०
कसबा पेठ - २६८
एकूण - ८ हजार ४२४


एएसडीडी यादीतील अनकलेक्टेबल मतदार (जमा न झालेले अर्ज)
एकूण : २८ लाख ६६ हजार ४८१
कारण - मतदारसंख्या
दुबार - १ लाख ४३ हजार ९७५
मृत - ३ लाख १२ हजार ४८
अनुपस्थित- १७ लाख ८३ हजार ५८
स्थलांतरित - ५ लाख ९१ हजार ३८
इतर - ३६ हजार ३६२

सुनावणीसाठी पात्र मतदार
प्रारूप मतदार यादीतील - ६२ लाख ११ हजार ९५० मतदारांपैकी
विसंगती असलेले मतदार - ५ लाख ७७ हजार ८२१
मॅपिंग न झालेले मतदार - ७ लाख ५४ हजार ५९७
एकूण सुनावणी होणारे मतदार - १३ लाख ३२ हजार ४१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

SCROLL FOR NEXT