अपघातामध्ये ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू sakal
पुणे

वालचंदनगर : बेलवाडीजवळील अपघातामध्ये ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

उसाचा ट्रॅक्टर-ट्रॉली व चारचाकी गाडी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू

राजकुमार थोरात

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) जवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावरती उसाचा ट्रॅक्टर-ट्रॉली व चारचाकी गाडी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक बाळू दामू माळी (वय ४५,रा.कळशी ता.इंदापूर) याचा मृत्यू झाला. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आज बुधवार (ता.२७) रोजी पहाटे पाच च्या सुमारास ट्रॅक्टरचालक बाळू माळी हे उसाचा दोन ट्रेलर भरलेला ट्रॅक्टर व ट्राॅली घेवून जंक्शन बाजूकडून भवानीनगर बाजू कडे चालले होेते. बेलवाडी जवळच्या खारा ओढ्याच्या पुलावर याच वेळी बारामतीकडून इंदापूर बाजुकडे चाललेल्या चारचाकी गाडी व ट्रॅक्टर ट्राॅलीची जोरात धडक झाल्यामुळे अपघात झाला.

अपघातामध्ये ट्रॅक्टरचालक बाळू माळी यांचा अंगावरती उसाच्या ट्रेलर पडल्याने माळी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये चारचाकी गाडीपेक्षा ट्रॅक्टर जास्त नुकसान झाले असून ट्रॅक्टरचे पाठीमागे चाक व पुढील चाके तुटली असून चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारचाकी चालक तुषार तुकाराम आईनकर (रा.ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून विकास सदाशिव मत्रे (रा.पिंपरे) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलिस हवालदार गुलाब पाटील तपास करीत आहेत.

अरुंद पुल ठरतोय धोकादायक...

बेलवाडी (ता.इंदापूर) जवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर खाराओढ्यावरती अरुंद पुल आहे. अरुंद पुलावरुन दोन वाहने एकाचवेळी ये-जा करीत असताना अपघात होत आहेत. आत्तपर्यंत अरुंद पुलामुळे शेकडो अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT