पुणे

कालवा सल्लागार समितीची बैठक महिना अखेरीस होणार

CD

पुणे, ता. २३ : पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीच्या पाणी वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालव्यातून एक हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून गेल्या आठवडाभरात धरणातील पाणीसाठा एक टीएमसीने कमी झाला आहे. चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा सध्या २४.५१ टीएमसी (८४.०८ टक्के) आहे.

दुष्काळी स्थिती असल्यामुळे, धरणातील पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी राखून ठेवावे तसेच १६ ऑक्टोबरपासून सिंचनासाठी पाणी देऊ नये. त्यानुसार जल आराखडा सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जलसंपदा विभागाने जल आराखडा तयार करून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर डुडी यांनी बैठक घेऊन २० टक्के पाणी कपात करण्याची सूचना केली. पुणे महापालिकेने आधीपासूनच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लागू केली आहे. सध्या दहा टक्के पाणी कपात केली असून, त्यात वाढ करणार नाही. २८ ऑक्टोबरनंतर निर्णय घेऊ, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक महिनाअखेरीला होणार आहे. त्यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, दौंडचे आमदार राहूल कुल उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटप कसे होणार, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतीसाठी दहा टीएमसी पाणी सोडले
जलसंपदा विभागाने १६ जुलै ते २४ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या आवर्तनात शेतीसाठी सुमारे ६.३३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर, २५ सप्टेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू केले आहे. या महिनाभरात जवळपास अडीच ते तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. दौंड तालुक्यात कालव्यातून पाणी देण्यात येत आहे. जवळपास दहा टीएमसी पाणी शेतीला सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT