पुणे

नदी-कालवे झाले खासगी पाण्याचे ‘एटीएम’!

CD

पुणे, ता. ९ : शहरातील नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची वेळ आली असताना दुसरीकडे नदीपात्र आणि कालव्यांमधून पाण्याची चोरी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना काही जणांनी नदीचे आणि कालव्यांचे पाणी खासगी मालमत्तांमध्ये वळवून त्याची व्यावसायिक विक्री करण्याचा धंदाच सुरू केला आहे. पवना नदीपात्रातील रावेतपासून पवना धरणापर्यंतच्या पट्ट्यासह पुणे महापालिका हद्दीतील कालव्यांमधून बेकायदा पाणीउपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत सध्या २२.६१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, गतवर्षी याच दिवशी तो २८.१८ टीएमसी होता. म्हणजेच यंदा साठ्यात ५.५७ टीएमसीने घट झाली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना नदीपात्र आणि कालव्यांमधून होणारा अनधिकृत उपसा चिंताजनक ठरत आहे. पवना नदीपात्रातील रावेत परिसरात नदीतून पाइपलाइनद्वारे पाणी उपसून ते विहिरीत साठविण्याचा आणि टँकरद्वारे विकण्याचा प्रकार यापूर्वी उघड झाला होता. त्यानंतर आता रावेत बंधाऱ्यापासून पवना धरणापर्यंतच्या नदीपात्राची तपासणी करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. नदीपात्रातून पाइपलाइन टाकून पाणी उचलणारे, पंप बसविणारे आणि टँकर भरण्यासाठी खासगी यंत्रणा उभारणाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत.

पवना नदीसह पुणे महापालिका हद्दीतील खडकवासला कालव्यांमधील अनधिकृत उपशावरही कारवाई केली जाणार आहे. कालव्यांमधून पाणी खासगी जागेत वळविणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. खासगी वापरासाठी तसेच टँकरद्वारे विक्रीसाठी वापरले जात असल्यास त्यावरही कारवाई होणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीचोरीबरोबरच कालव्यांमधील अनधिकृत पाणीवाटप रोखण्याचे आव्हान विभागासमोर आहे.

गुन्हे दाखल केले जाणार...
नोटिसा बजावल्यानंतरही अनधिकृत पाणीउपसा सुरू ठेवल्यास संबंधितांची यंत्रणा हटविणे, बेकायदा जोडण्या बंद करणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध साठ्याचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी नदीपात्रापासून कालव्यांपर्यंत तपासणी मोहीम राबविली जात आहे. आता या मोहिमेत किती ठिकाणी पाणीचोरी उघड होते आणि प्रत्यक्षात किती उपसे बंद होतात, याकडे लक्ष लागले आहे.
-----------
पवना नदीपात्रासह खडकवासला कालव्यांमधील अनधिकृत पाणीउपशाची तपासणी सुरू केली आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात येत असून, अनधिकृत उपसा तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही पाणीचोरी सुरू राहिल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

SCROLL FOR NEXT