Pune Water Crisis Sakal
पुणे

Pune Water Crisis : पुणे जिल्ह्यातील ११ तालुके तहानलेले; चार लाख नागरिक, दोन लाख जनावरांना टँकरद्वारे पुरवठा

पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे आणि ३५३ वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईची झळ बसली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात आजअखेर १३ पैकी ११ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या १७८ गावे आणि एक हजार ३१६ वाड्यावस्त्यांना २५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

ही सर्व गावे मिळून चार लाख तीन हजार २०० लोकसंख्या आणि एक लाख ७० हजार ३६४ जनावरे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात मावळ व मुळशी हे अन्य दोन तालुके पहिल्यापासून टँकरमुक्त आहेत.

पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे आणि ३५३ वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईची झळ बसली आहे. या तालुक्यातील गावे आणि वाड्यांना ८७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

या तालुक्यातील एक लाख सहा हजार ८८१ लोकसंख्येला आणि ७४ हजार ३३६ जनावरांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय टँकरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून ही बाब उघड झाली आहे.

पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ७८ खासगी विहिरी आणि १९ विंधन विहीरी (बोअरवेल) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पुरंदरपाठोपाठ आंबेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तालुक्यांतील २९ गावे आणि १५८ वाड्या-वस्त्यांना २३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

तालुकानिहाय टँकरची संख्या

  • आंबेगाव - २३

  • बारामती - २८

  • भोर - ०९

  • दौंड -१०

  • हवेली - २६

  • इंदापूर - १९

  • जुन्नर - २०

  • खेड - १४

  • पुरंदर - ८७

  • शिरूर - १२

  • वेल्हे -०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT