पुणे

पाणीटंचाईचा टँकरचालकांकडून गैरफायदा

CD

पुणे, ता. २५ : शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. खासगी टँकरचालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाण्यासाठी पर्याय नसल्याने नागरिकांना अवाच्या सवा किंमत मोजावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेने टँकरच्या दरांवर नियंत्रण आणून निश्चित दर जाहीर करावेत. तसेच पाणीटंचाईचा गैरफायदा घेणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे टँकर लॉबीला फायदा होत आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत, तर काही नागरिकांनी धरणांमध्ये जुलै- ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

शहरातील पाणीटंचाईचा टँकरचालक गैरफायदा घेत आहेत. पाण्यासाठी गरजूंना नाइलाजाने जास्त पैसे मोजावे लागत असून, या प्रकारावर महापालिकेने लगाम घालावा.
- भूषण गोरे, नागरिक

शहराला नियमित पाणीपुरवठा करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. पाणीटंचाईवर तातडीने प्रभावी उपाययोजना केली पाहिजे. टँकरच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांची आर्थिक आणि मानसिक अडवणूक होत आहे.
- विनायक मोकाटे

महापालिका दररोज मोठ्या प्रमाणात पाणी टँकरचालकांना उपलब्ध करून देत असताना तेच पाणी नागरिकांना अनेकपट दराने विकले जात आहे. नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसा पाणीपुरवठा मिळत नाही.
- एक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बॅंकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शेतकऱ्याने जीवन संपवल्यास जबाबदार धरणार

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

ढिंग टांग : गर्रर्र...गर्रर्र...गर्जना!

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT