पुणे

जलजीवनमधील कर्मचाऱ्यांचे मानधनाविना काम

CD

पुणे, ता. २४ : जलजीवन मिशन आणि पाणी व स्वच्छता विभागांतर्गत राज्यभर कार्यरत असलेले गट समन्वयक (बीआरसी) आणि समूह समन्वयक (सीआरसी) यांना सात महिन्यांपासून मानधन नाही. त्यामुळे जलजीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. अखेर बावीस दिवसांनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शासनाच्या विनंतीनंतर कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. मात्र, थकीत मानधनाचा प्रश्न अद्याप कायम आहे.
राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनने राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेला दिलेल्या पत्रात कामबंद आंदोलन तत्काळ मागे घेण्याची विनंती केली होती. या पत्रात जलजीवन मिशनमधील सहाय्यकृत बाबी या घटकासाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याने मानधन प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होताच संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन देण्यात येईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाच्या या विनंतीनंतर राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले असून, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेशी संबंधित कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत कंत्राटी पद्धतीने ६०६ गट समन्वयक आणि समूह समन्वयक कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावर १३ कर्मचारी कार्यरत असून, ते जलजीवन मिशनबरोबरच पाणी व स्वच्छता विभागातील विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहेत. दरम्यान, सप्टेंबर २०२४ पासून केंद्र शासनाचा हिस्सा प्राप्त झालेला नसल्याने आणि वित्त विभागाच्या सूचनांनुसार केंद्राचा हिस्सा मिळाल्यानंतरच राज्याचा हिस्सा खर्च करता येत असल्याने मानधनाचा प्रश्न निर्माण झाल्याचे शासनाचे म्हणणे आहे. मात्र, मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.


सात महिन्यांपासून आम्हाला मानधन मिळालेले नाही. शासनाच्या विनंतीला प्रतिसाद देत आम्ही आंदोलन मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू झालो आहोत. मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागविणे अत्यंत कठीण झाले आहे. शासनाने केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता पर्यायी व्यवस्था करून किमान काही महिन्यांचे थकीत मानधन तातडीने अदा करावे.
- दीपाली वाघमारे, जिल्हाध्यक्ष, राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

SCROLL FOR NEXT