pune news  sakal
पुणे

Pune : 'या' कारणांमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्यांना दर रविवारी मनःस्ताप

याबाबत संबंधित वॉटर पार्क च्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.

निलेश बोरुडे

Pune - डोणजे येथील वॉटर पार्कला आलेल्या नागरिकांच्या वाहनांमुळे डोणजे-गोळेवाडी रस्त्यावर दर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक रहिवाशांसह सिंहगडाकडे ये-जा करणारे पर्यटक व दुर्ग प्रेमींना या रस्त्यात बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांमुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित वॉटर पार्क चालक वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

डोणजे येथील वॉटर पार्कला सुट्टीच्या दिवशी तब्बल चार ते पाच हजार नागरिक येतात. सध्या शाळांना सुट्टी असल्याने व उन्हाची तीव्रता असल्याने दिवसभर वॉटर पार्कला तुडुंब गर्दी दिसून येत आहे. संबंधित वॉटर पार्क चालकाने येणाऱ्या ग्राहकांसाठी वाहनतळ केलेला आहे.

मात्र दर रविवारी हा वाहनतळ पूर्ण भरून मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असतात. डोणजे गावातून सिंहगडाकडे जाणारा रस्ता अगोदरच अरुंद आहे. त्यातच या वॉटर पार्क जवळ रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने इतर पर्यटक व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दर रविवारी सिंहगडाकडे जाणाऱ्या पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या जास्त असते. त्यामुळे या वॉटर पार्क च्या समोर वाहतूक कोंडी होते. अनेक रिक्षाचालकही गर्दी करुन वॉटर पार्क च्या गेटसमोर थांबलेले असतात. बस किंवा इतर मोठे वाहन आल्यास या रिक्षा, रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

याबाबत संबंधित वॉटर पार्क च्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही. पोलीस प्रशासनाने मात्र या ठिकाणी असे काहीही आढळून आले नाही असे उत्तर दिले आहे.

"वॉटर पार्क च्या समोर दर रविवारी मोठी गर्दी असते. दोन्ही बाजूंना गाड्या लावलेल्या असल्याने इतरांना त्याचा त्रास होतो. या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे अपघातही झालेला आहे." योगेश भामे, ग्रामपंचायत सदस्य, डोणजे.

"माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित वॉटर पार्क च्या ठिकाणी पाठविले होते परंतु त्यावेळी तेथे गर्दी किंवा वाहतूक कोंडी आढळून आली नाही." सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT