पुणे

मालकाऐवजी कामगाराचा खून

CD

शिरूर/ पुणे, ता. ६ : कारेगाव (ता. शिरू) येथील जमिनीच्या वादातून बाटलीबंद पाण्याच्या प्लांटमालकाचा खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊ देऊन मारेकऱ्यांना कामाला लावण्यात आले. मात्र, प्लांटवर पोहोचलेल्या मारेकऱ्यांनी मालकाऐवजी कामगाराला लक्ष्य करून त्याच्या डोक्यात गोळी झाडली. या खूनाचा रांजणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून, पाच जणांना अटक केली आहे.
या घटनेत हामजा उस्मान शेख (वय ३९) यांचा मृत्यू झाला. कारेगाव येथील ‘समु इंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये २९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मारेकऱ्यांनी शेख यांनाच प्लांटमालक विकास नवले समजून त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचे तपासात समोर आले आहे. सार्थक संदेश कोहकडे (वय २४), तुषार अजय तोडकर (वय २६), संतोष मधुकर मांजरे (वय ३७), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७) आणि योगेश विलास इडोळे (वय २८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव हे दोघे पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.कारेगाव येथील ‘समु इंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये २९ सप्टेंबरला हामजा शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याबाबत त्यांच्या पत्नी अविताबी यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. या प्रकरणातील पवन हुंडारे आणि पृथ्वी जाधव हे अद्याप पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या पथकाने केली.

आरोपी उत्तर प्रदेशातून ताब्यात
तांत्रिक तपासात संशयित संतोष मांजरे हा उत्तर प्रदेशात पसार झाल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनामागील कटाची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या तपासानुसार, सार्थक कोहकडे याचा वॉटर प्लांटमालक विकास नवले यांच्याशी जमिनीवरून वाद होता. या वादातून कोहकडे याने तुषार तोडकरमार्फत संतोष मांजरे याला वॉटर प्लांटमालकाचा खून करण्याची सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. त्यानंतर मांजरे याने पवन हुंडारे, पृथ्वी जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या मदतीने खुनाचा कट रचला. त्यानुसार २९ सप्टेंबरला मारेकरी पाण्याच्या प्लांटवर गेले. त्यावेळी त्यांनी हामजा शेख यांनाच विकास नवले समजून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT