pune water supply disrupted due to leakage in water channel parvati esakal
पुणे

Pune Water Supply : पर्वती येथील जलवाहिनीतील गळतीमुळे पाणी पुरवठा विस्कळित

नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक सोसायट्यांनी टँकर मागवून पाण्याची व्यवस्था केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पर्वती येथील पाण्याच्या टाक्यांना जोडणाऱ्या जलवाहिनीतून मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत असल्याने सहकारनगर, पद्मावती, शिवदर्शनसह इतर भागात आज (ता. १७) दिवसभर कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक सोसायट्यांनी टँकर मागवून पाण्याची व्यवस्था केली.

शहरातील पाणी कपात मागे घेतली असली तरीही जलवाहिनीतील गळतीमुळे नागरिकांना पाण्याचा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पर्वती पायथा येथे १२०० मिमि व्यासाच्या जलवाहिनीला एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून गळती होती, त्यामुळे पेठांमधील काही भागात कमी दाबाने पाणी मिळत होते.

या ठिकाणी बुधवारी (ता. १६) दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर आज पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथे एचएलआर चौकोनी आणि एचएलआर गोल टाकीला जोडणाऱ्या जलवाहिनीतील गळती समोर आली.

त्याचा फटका सहकारनगर, शिवदर्शन, अरण्येश्‍वर, तावरे चौक, वाळवेकर नगर, ट्रेझर पार्क, पद्मादर्शन सोसायटी, अण्णाभाऊ साठे वसाहत, नवमहाराष्ट्र सोसायटी, टांगेवाला कॉलनी, सातारा रस्त्याचा काही भाग, सहकारनगर भाग दोन यासह इतर भागाला बसला.

जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम दुपारी पूर्ण झाल्यानंतर या पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम म्हणाले, ‘‘समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मिटर बसविल्यानंतर अनेक दिवसांपासून या भागात पाणी कमी दाबाने येत आहे.

त्यात परत सहकारनगर, शिवदर्शन यासह काही भागात आज अचानक आले नाही. त्यामुळे नागरिकांनी टँकर मागवून घेतले. वारंवार कमी दाबाने पाणी येत असल्याने यावर महापालिकेने तातडीने उपाय योजना करणे आवश्‍यक आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘पर्वती येथील एचएलआर चौकोनी व एचएलआर गोल टाकीला जोडणाऱ्या जलवाहिनीतून पाणी गळती होत असल्याने आज दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम दुपारी पूर्ण झाल्यानंतर या भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT